vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…

 बॉलीवूड प्रतिनिधी –

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी नुकतेच आई-बाबा झाले आहेत. कियारा अडवाणीने मुलीला जन्म दिला आहे. सध्या या दोन्ही जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

काल मंगळवारी या जोडप्याला कन्यारत्न प्राप्ती झाली. दोघांनी दिलेल्या या आनंदाच्या बातमीमुळे बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील दोघांना शुभेच्छा आणि अभिनंदन केलं आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनी फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियावर गरोदरपणाची माहिती दिली होती.

कियारा-सिद्धार्थ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर गोंडस लहान बाळाच्या मोज्यांचा फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अशातच आता कियारा आणि सिद्धार्थ मंगळवारी आई-बाबा झाले. सिद्धार्थच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सेलिब्रिटी पापाराझीच्या अकाऊंटवरून पोस्ट शेअर दरम्यान, सोशल मीडियावर सेलिब्रिटी पापाराझी अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आई-बाबा झाल्याचं म्हटलं आहे. ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दोघे मंगळवारी आई-बाबा झाले आहेत. त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली असून अलीकडेच सिद्धार्थ कियाराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसला होता. त्याच्यासोबत त्याचे आणि कियाराचे कुटुंबीय देखील रुग्णालयात जाताना दिसले होते. त्यामुळे मंगळवारी ही आनंदाची बातमी आली. कियारा आणि तिची मुलगी दोघेही सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. चाहते देखील दोघांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. यासोबतच चाहते आता कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवतात आणि तिची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कियारा-सिद्धार्थ लग्न ,बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2023 मध्ये लग्न केलं. त्या दोघांच्या डेटिंगची सोशल मीडियावर देखील खूप चर्चा होती. दोघे 2020 पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले. त्यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यावेळी त्यांच्या लग्नाला काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. अशातच आता दोघे आई-बाबा झाले आहेत.

संबंधित पोस्ट

उदयपूर फाइल्स- सत्य घटनेवर  कन्हैयालाल दर्जी हत्याकांडावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, ११ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित होणार

vishwatmaklokswamivarta

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा जाट च्या यशानंतर आता नव्या चित्रपट ‘ऑपरेशन खुकरी’ या चित्रपटात मोठी भूमिका करणार चित्रपटाचे हक्क घेतले विकत ….

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव

चतु:रस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार देऊन सन्मान, स्वरा जोशी हिला ही गंधार बाल पुरस्कार प्रदान.

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या ‘Undocumented.PDF’ लघुपटाच्या वर्ल्ड प्रीमिअर विषयी कुतूहल! स्थलांतर, मानवी भावना आणि वास्तवाला भिडणारा नाफा फिल्म्सचा नवा लघुपट!

vishwatmaklokswamivarta