vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

 

        सांगली, प्रतिनिधी) : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षांतर्गत कार्यरत विविध विभागांमार्फत नियमितपणे एचआयव्ही रूग्णांची तपासणी करून बाधित रूग्णांवर औषधोपचार केले जातात. एच. आय. व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे एआरटी औषधोपचार घेतल्यास त्यांना सामान्य जीवन जगता येते. यासाठी बाधित रूग्णांनी नियमितपणे तपासणी करून औषधोपचार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

 जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या, एचआयव्ही बाधीत सर्व रूग्ण औषधोपचारावर येण्यासाठी प्रयत्न करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातही गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी केली जाते. त्यांनी त्या 100 टक्के कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

    यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण रूग्णांची तपासणी व त्यामध्ये संसर्गितांचे प्रमाण, तालुकानिहाय एच. आय. व्ही. बाधित रूग्णसंख्या, ए. आर. टी. सेंटरमधील उपचार, एच. आय. व्ही – टी. बी. समन्वय, गर्भवती मातांची तपासणी व संसर्गाचे प्रमाण आदिंचा आढावा घेण्यात आला.

   जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ यांनी एड्स नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची सादरीकरणातून माहिती दिली.00000

संबंधित पोस्ट

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

तामिळनाडूत मोठी उलथापालथ, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाची पदार्पणातच दणदणीत कामगिरी

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर कारागृहाला प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांची भेट

बाल हक्क संदर्भात 21 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय परिषदेचे आयोजन*

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन