vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद 6 हजार 542 प्रकरणे निकाली…

राष्ट्रीय लोकअदालतीला उस्फुर्त प्रतिसाद
6 हजार 542 प्रकरणे निकाली…

सातारा, प्रतिनिधी -राष्ट्रीय लोक अदालतीचे 22 मार्च रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ९ हजार ९६३ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी प्रलंबित २ हजार ५२२ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. त्यामध्ये एकूण २५ कोटी ५२ लाख ८१ हजार ६७० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच वादपूर्व १५ हजार २३९ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी तडजोडीने ४ हजार २० प्रकरणे निकाली निघाली. वादपूर्व प्रकरणांमध्ये एकूण ८१ कोटी ७४ लाख ६ हजार २२९ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. या लोकअदालतीमध्ये एकूण ६ हजार ५४२ प्रकरणे निकाली निघाली आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती. निना नि. बेदरकर यांनी दिली.

दि. १७ ते २१ मार्च २०२५ या कालावधीमधील स्पेशल डाईव्हमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ६७० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वैवाहिक वाद, तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी केसेस, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कर्ज, धनादेश न वठल्याची प्रकरणे इत्यादींचा समावेश आहे. वादपूर्व प्रकरणात फायनान्स कंपन्या, बँकांची कर्ज, दूरध्वनी व विद्युत देयके आणि ग्रामपंचायत, मालमत्ता पाणीप‌ट्टी कर वसुली प्रकरणे इ. प्रकरणांचा समावेश होता.
जिल्ह्याचे ठिकाणी एकूण ७ आणि तालुका न्यायालयात एकूण २४ पॅनेल करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, यांनी काम पाहिले. प्रत्येक पॅनलवर एक विधिज्ञ पॅनल सदस्य म्हणून काम पाहत होते. राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून भविष्यात आणखी प्रबोधन आणि प्रयत्न करणार असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती. निना नि. बेदरकर यांनी सांगितले.
0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

vishwatmaklokswamivarta

चिखली चे गट शिक्षण अधिकारी विरुद्ध कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु शिक्षणाधिकारी प्राथमिक हेच पाठीशी घालत आहे

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले

अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना उद्या नियुक्तीपत्रे प्रदान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध् – शिरसाठ,परिषदेच्या ठरावांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – सावे ,मराठवाडा व्यापार परिषदेस व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद