vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पेण भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याच्या घटनेचेभूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण..

पेण भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याच्या घटनेचेभूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण..

रायगड( प्रतिनिधी:- पेण तालुक्यातील तिलोरे व सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी येथे भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याची घटना काल रात्री 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान घडली असे नागरिकांनी स्थानिक प्रशासनास कळविले होते. सदर घटना भूकंप नसून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या घटनेची भारतीय हवामान विभाग मुंबई (IMD) नुसार तसेच कोयनानगर जि.सातारा येथील भूमापन केंद्र येथे भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आढळून आले आहे.

या ठिकाणी तहसिलदार सुधागड यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. सदर घटनेत काही घरांचे किरकोळ नुकसान झाले असून जिवीतहानी झालेली नाही.

या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.000000

संबंधित पोस्ट

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची शंभर टक्के कामगिरी**रायगड जिल्ह्यात प्रक्रिया पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ*

कुष्ठरोग निर्मूलन जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेत २०० धावपटूंचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

कॅन्सर रजिस्ट्री सुरू करणारी पहिली महानगरपालिका असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

सातारा जिल्ह्यात जनगणना 2027 साठी जोरदार तयारी सुरू..