vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

जालना : प्रतिनिधी स्व. कल्याणराव घोगरे स्टेडियममध्ये आज गुरुवार, दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता कुदळ टाकून मान्यवरांच्या हस्ते सभा मंंडपाचे भूमीपूजन संपन्न झाले.

यावेळी जालना पीपल्स बँकेचे चेअरमन तथा उद्योजक संजय मुथा, गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोकराव आगलावे, जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील, ूभास्करराव अंबेकर, भास्करराव दानवे, भाऊसाहेब घुगे, फेस्टीवलचे माजी अध्यक्ष राजेंद्र गोेेरे, डॉ. संजय राख, राजेंद्र राख, शरद देशमुख, दिनेश फलके, किरण गरड, चंद्रशेखर वाळींबे, सुभाषराव कोळकर, माऊली कदम, अशोकराव उबाळे, अजिंक्य घोगरे, सुरेशराव मुळे, प्रा. राजेंद्र भोसले, चेअरमन बबनराव गाडेकर, अरविंद देशमुख, अशोकराव पडुळ, अ‍ॅड. देशमुख, राजेंद्र जाधव,सिध्दीविनायक मुळे, अवनिश गरड, सुहास मुंडे, प्रकाश जायभाये, रविंद्र हुसे, अविनाश भंडे, संजय देशमुख, श्री, पवार, ज्ञानेश्वर डोंगरे, आदींची उपस्थिती होती.

प्रास्ताविकपर भाषणात श्री. आगलावे म्हणाले की, फेस्टीवलचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे भाऊ कदम यांच्यासह अनेक सुरेख कलाकारांना आमंत्रीत करण्यात येणार असून बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षात या फेस्टीवलचे नांव पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झाले असून विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकर देखील येथे येऊन गेले आहे. त्याच धर्तीवर यंदाही कार्यक्रमाची रेलचेल राहणार अल्याचे ही आगलावे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांनीही समयोचित भाषणे केली.

—————————

(छाया : अनिल व्यवहारे)

संबंधित पोस्ट

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे

रखरखत्या उन्हाळ्यात हिरवाईने नटलेले शुभ वर्तमान-अरण्यम प्रकल्प;कातपूर येथे ४.२५ हेक्टरवर १ लाख २७ हजार रोपांची घनवन लागवड..

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव-सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांची अपार आयडी आणि डिजीलॉकर नोंदणी पूर्ण करण्याचे उच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश जून २०२६ पर्यंत क्रेडिट डेटा अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना

जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर