vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण..

बारामती, प्रतिनिधी: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन देईल, स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या या अमूल्य देणगीचे जतन करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

नटराज नाट्य कला मंदिराच्या परिसरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर, रवींद्र लाड, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यलढ्यात बारामतीकरांचा सहभाग,श्री. पवार म्हणाले, कविवर्य मोरोपंत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बारामती शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध देशभक्त आणि क्रांतिकारकांमध्ये बारामतीकरांचा सहभाग होता. सन १९४२ चा लढा तसेच १९४९ च्या स्वातंत्र्य लढ्यात विविध स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. नगर परिषदेच्यवतीने सन १९७३ यावर्षी संविधान स्तंभ उभा केला, यामध्ये तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिकांच्या नावांचा शिलालेख समाविष्ट आहे.

राष्ट्रध्वज स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतिक

राष्ट्रध्वज देशाच्या स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतीक आहे, त्यामधील केशरी रंग हा धैर्य आणि त्याग, पांढरा रंग शांती आणि सत्य आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वास तसेच मध्यभागी असलेले अशोक चक्र कायदा आणि प्रगतीचे प्रतीक आहे. महात्मा गांधी, शहिद भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून राष्ट्रध्वज उंचावला आहे.

नटराज नाट्य कला मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान,आज शहरात नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज स्तंभ बारामतीकरांकरिता अभिमान आणि आनंदाची बाब आहे. स्तंभ उभारण्याकरिता मंडळाने केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक करुन हा स्तुत्य असा उपक्रम आहे. गेल्या ४५ वर्षात मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, ऐतिहासिक, भावस्पर्शी कथनावरील नाटकांचा समावेश असलेले तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे सुद्धा आयोजन केले असून या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार कलाविष्कार पाहायला मिळाला असेल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

इंदोर शहराच्या धर्तीवर शहराचा विकास करण्याचा मानस,इंदोर शहराच्या धर्तीवर बारामती शहराचा विकास करण्याचा मानस व्यक्त करुन श्री. पवार म्हणाले, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात येणार आहे. शहरात अनधिकृत जाहिरात फलक लागणार नाही, स्वच्छता राहिली पाहिजे, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखली पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी. याकरिता नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,

नागरिकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा मिळवून देण्याकरिता तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच विकास कामाच्या अनुषंगाने विधायक सूचनाही कराव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तीन हत्ती चौकाला ‘तिरंगा सर्कल’ असे नाव देण्यात आले असून या नामफलकाचे श्री. पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

श्री क्षेत्र कौंडण्यपूर शक्तिपीठ महामार्गाला जोडणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्दीनी नदीचे पूजन करून 211 मीटरची अखंड साडी अर्पण

श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद – तब्बल ५.५३ लाख व्ह्युव मिळवलेले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले माहितीपट

पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी खबरदारी घ्या !!

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!- अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतांना बेस्ट बसमधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!नवीन गाड्यांवर सुधारित सूचना लावण्याचे बेस्ट प्रशासनाचे सुराज्य अभियानाला आश्वासन!

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

vishwatmaklokswamivarta