vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल”चापर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा..

महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल”चापर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा..

 

मुंबई, प्रतिनिधी: महाबळेश्वर येथे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल” चे आयोजन करण्यात येणार असून या महोत्सवाच्या तयारीचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी मंत्रालयातील दालनात आढावा घेतला.

यावेळी पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, संचालक बी. एन. पाटील तसेच दूरदृश्य कार्यप्रणालीवरून सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पर्यटनवाढीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या महाबळेश्वर मधील ‘महा फेस्टिवल’साठी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामांच्या जबाबदाऱ्यांविषयी मंत्री श्री. देसाई यांनी माहिती जाणून घेतली. तसेच फेस्टिवल दरम्यान पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, स्वच्छता, वाहतुकीचे नियोजन, येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेवर जास्त लक्ष ठेवण्यासंदर्भात सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या महोत्सवाच्या कामांसाठी जिल्हा आणि स्थानिक स्तरावर नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

००००

संबंधित पोस्ट

भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जालना जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक,मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजनासाठीसंबंधित विभागांनी समन्वयाने आखणी करावी- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

शिवमय वातावरणात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा◾ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव…

vishwatmaklokswamivarta

देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर श्री केदारनाथ धामाचे दरवाजे सर्व भाविकांसाठी विधीवत रीतीने उघडण्यात आले. 

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

दिनांक 25 जानेवारी, 2025‘राष्ट्रीय मतदार दिवस’ : मतदार जागृती..

vishwatmaklokswamivarta