vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कृपया प्रसिद्धीसाठी-कोवळ्या बालकांसाठी ‘गोमांस’ खाण्याचा अजब सल्ला! वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

कृपया प्रसिद्धीसाठी-कोवळ्या बालकांसाठी ‘गोमांस’ खाण्याचा अजब सल्ला! वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

 

     नवी मुंबई प्रतिनिधी: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात ‘भारतीय बालरोग अकादमी’ (IAP) द्वारे लहान मुलांच्या पूरक आहार पत्रकात ‘गोमांस’ (Beef) खाण्याचा सल्ला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना आणि शासनाने गोमातेला ‘राज्य माता’ घोषित केले असतांना सरकारी रुग्णालयात असा बेकायदेशीर प्रचार करणे हा कायद्याचा भंग व शासनाचा थेट अवमान आहे. याप्रकरणी दोषी संस्था व अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांनाही दिले आहे. सदर निवेदन सर्वश्री रवींद्र नलावडे, अशोक सावंत, गोविंद प्रसाद दुबे यांनी सुपूर्त केले. सदर निवेदनाची प्रत नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकड़ेही पाठवली आहे.

  हिंदु धर्मीय जनमानसात गाईला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असून गोहत्येला महापातक मानले गेले आहे; तसेच आईचे दूध न मिळणाऱ्या बालकांसाठी गोमाता हीच दुसरी माता असते. अशा अत्यंत संवेदनशील पार्श्वभूमीवर कोवळ्या बालकांना गोमांस खाण्यास प्रवृत्त करणारी ही विकृत धारणा कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना तीव्रतेने दुखावणारी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. आज एकीकडे पाश्चात्य देश भारतीय वंशाच्या देशी गाईंचे महत्त्व ओळखून मानसिक शांतीसाठी ‘काऊ थेरपी’चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत, तर दुसरीकडे आपल्याच देशातील गीर, साहिवाल आणि देवणी यांसारख्या दुर्मिळ प्रजातींची संख्या घटत आहे. अशा स्थितीत भारतातील एका जबाबदार आरोग्य संस्थेकडून गोमांस भक्षणाला छुपे प्रोत्साहन दिले जाणे हे एका मोठ्या षडयंत्राचा भाग असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

    या गंभीर गैरप्रकाराचा जाहीर निषेध करत हिंदु जनजागृती समिती प्रशासनाकडे ही आग्रही मागणी करत आहे की, भारतीय बालरोग अकादमी (IAP) या संस्थेवर आणि वाशी महानगरपालिका रुग्णालयातील ज्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या विघातक पत्रकाला परवानगी दिली, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, तसेच नवी मुंबई क्षेत्रातील व राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून ही विवादास्पद व आक्षेपार्ह पत्रके तात्काळ जप्त करून ती नष्ट करण्याचे कडक आदेश प्रशासनाला देण्यात यावेत. प्रशासनाकडून यावर वेळेत आणि ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही श्री. घनवट यांनी दिला आहे.श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती (संपर्क : ७०२०३८३२६४)

0000

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज दिनांक १५.०१.२०२५ पासुन शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

जालना शहरासाठी श्रमदान – एक दिवस- एक तास शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा      – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

vishwatmaklokswamivarta

अमरावती जिल्ह्यासाठी ‘आधारभूत’ खरेदी केंद्रांना मंजुरी;शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील कृषी सेवा केंद्रांवर साठा व दर दर्शविणारे फलक अनिवार्य.राहाता तालुक्याची खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक संपन्न

पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क – नवी मुंबईतील परिस्थिती सुस्थितीत

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना  बुधवार २० रोजी सुट्टी, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापानाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक/माध्यमिक/खासगी अनुदानित/विना अनुदानित शाळांना आज बुधवार २० रोजी सुट्टी जाहीर