vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर, प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 19 जून, 2026 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 3 जुलै, 2026 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.

शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळात सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगी द्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

***

संबंधित पोस्ट

राज्याचा कला, परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार*

vishwatmaklokswamivarta

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ जानेवारी२०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण नियमानुकुल करून घ्यावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी 

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच यशस्वी ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया संपन्न 

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम