vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

लातूर जिल्ह्यात २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’; पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

लातूर जिल्ह्यात २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’; पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी घेतला आढावा

लातूर, प्रतिनिधी): जिल्ह्यात २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. लातूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज आढावा घेतला. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर यांच्यासह योग विषयक विविध संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ अशी निश्चित करण्यात आली आहे. या दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात २१ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते सकाळी ७:४५ या वेळेत सामूहिक योग अभ्यासाचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी केले. जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या संबंधित यंत्रणांनी काळजीपूर्वक पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

संबंधित पोस्ट

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद..

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

जितेंद्र अग्रवाल यांची सतरावी फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र