vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपायुक्तांपेक्षा ठाणे महापालिकेत अभियंते झाले बडे !आदेश झुगारुन उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्याची दिली परवानगीउद्यानात बागडणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ विक्रांत चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा

उपायुक्तांपेक्षा ठाणे महापालिकेत अभियंते झाले बडे !आदेश झुगारुन उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्याची दिली परवानगीउद्यानात बागडणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ विक्रांत चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा

 

ठाणे प्रतिनिधी- उद्यानात लहान मुले खेळत असतात, तर वयोवृध्द नागरिक फेरफटका मारत असतात, या कारणांमुळे वर्तकनगर येथील उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्यास नकार देणाऱ्या उपायुक्तांच्या आदेशाला अभियंत्यांनी केराची टोपली दाखवत एमएसईबीला परवानगी दिली आहे. यामुळे येथील रहिवासी संतप्त असून काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि माजी स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी `काम थांबवा’ अन्यथा २३ जून रोजी पालिका मुख्यालयावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत भीमनगर येथील बिल्डिंग नं. ५४ च्या पाठीमागे ठाणे महापालिका निगा व देखभाल करत असलेले म्हाडाचे उद्यान आहे. एमएसईबीने या उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्याची विनंती केल्यानंतर म्हाडाने ठाणे मनपाकडे `ना हरकत पत्र’ मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरु केला होता. उद्यानाच्या जागेत असलेले मंदिर तसेच प्रवेशद्वाराकरीता जागा उपलब्ध नसलयाने आणि ट्रन्सफोर्मर मधून स्पार्क किंवा शार्ट सर्किट सारखी दुर्घटना घडल्यास लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, या कारणांमुळे उपायुक्तांनी ना हरकत प्रमाण पत्र देऊ नये असे स्पष्ट केले होते, अशी माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.

उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत बांधकाम खात्याचे किरण भोये, संदीप गायकवाड, रणधीर राणे, सुधीर गायकवाड, शहर विकास विभागाचे रविशंकर शिंदे यांनी परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देण्याबरोबरच उद्यानही म्हाडाकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. लहान मुलांच्या जीवशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांचा विक्रांत चव्हाण यांनी निषेध केला असून या अधिकाऱ्यांच्या निलंबासाठी व ट्रन्सफोर्मर बसवू नये या मागण्यांसाठी २३ जून पासून पालिका मुख्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिला आहे.0000

संबंधित पोस्ट

राज्य शासनाचे विविध कृषी पुरस्कार जाहीर जिल्ह्यातील 6 शेतकरी व 1 अधिकारी यांची निवड

धान खरेदीत बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना दणकारक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

vishwatmaklokswamivarta

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिबीर (कॅम्प) कार्यालयात वाढ…

vishwatmaklokswamivarta

ऐरोली नाट्यगृहाच्या बांधकामाची सुप्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत दामले यांनी पाहणी करून व्यक्त केले समाधान…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध; पाटबंधारे विभागाची माहितीअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन