vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त खिडक्या- खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त खिडक्या- खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार

ठाणे – प्रतिनिधी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. यावर्षीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त खिडक्या सुरु होणार आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले आहेत.

नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लोखो कोकणवासिय ठाणे, मुंबई आणि उपनगरांत स्थायिक झाले आहेत. गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा मोठा सण. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच. गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. कोकणवासियांसाठी गेल्या वर्षी प्रथमच दोन अतिरिक्त खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात उघडल्या होत्या. यावर्षी ही सुविधा मिळावी यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे २९ मे २०२६ रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत १० जून २०२६ रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे २ अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरु करत असल्याची माहिती दिली आहे.

११ जुलै २०२६ पासून या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहेत. सध्या ५ आरक्षण खिडक्या दोन सत्रात सुरु कार्यरत असून २ अतिरिक्त खिडक्या एकाच सत्रात सुरु होणार आहेत. ७ आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. तसेच खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीवरून आरक्षण केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी जवान तैनात ठेवण्यात येणार आहेत.

खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आआहे.

0000

0

संबंधित पोस्ट

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मोरारी बापू यांची राम कथा ऐकणे म्हणजे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक