vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्याप्रदेश

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

     अमरावती, प्रतिनिधी: उष्मालाट जनजागृती या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन एडीआरए इंडिया व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

  निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार नितीन खटके, आदित्य खंडारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, जिल्हा साथरोग आरोग्य अधिकारी श्री. अली, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे, क्षेत्रीय अधिकारी संतोष गिरी यावेळी उपस्थित होते.उष्मालाट उपायोजना जनजागृती या प्रकल्पाबद्दल इमरान माजिद तर अध्ययनाबाबत माहिती श्रीमती ली यांनी दिली. अनिल भटकर यांनी येणारे दिवसांमध्ये उष्माघाताचे वाढते परिणाम व त्यावर उपाययोजना, कार्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज साळुंखे यांनीही उष्माघात या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघना क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रविकिरण मोरे तर आभार श्री. सोविक यांनी मानले.

 

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजता या वेळेत मतदान सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

रक्ताच्या नात्याने केले ‘निराधार’ पण तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाने दिला आपुलकीचा आधार.!

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचीसमता पंधरवडा कालावधीत विशेष मोहीम..

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये