vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घोटाळेबाजांची एसआयटीमार्फत चौकशी करावी-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवारी धरणे / निदर्शने आंदोलन

घोटाळेबाजांची एसआयटीमार्फत चौकशी करावी-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शुक्रवारी धरणे / निदर्शने आंदोलन

गडचिरोली प्रतिनिधी: राज्‍यातील बोगस शिक्षक पदभरती प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी व विदर्भातील शिक्षण विभागातील अधिकारी यांची रिक्‍त पदे पदोन्नतीने तात्‍काळ भरण्यात यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात एक दिवसीय धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे.

नागपूर विभागासह राज्‍यात शिक्षण विभागातील बोगस शिक्षक पदभरती घोटाळा गाजत आहे. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या पवित्र शिक्षण विभागातील या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तेव्‍हा नागपूर विभागातील बाेगस शिक्षक पदभरती घोटाळ्यासह राज्‍यात शिक्षक पदभरती बंद असताना शिक्षण विभागात झालेल्‍या शिक्षक पदभरतीची राज्‍यस्‍तरावरून एसआयटी नियुक्‍त करून चौकशी करण्यात यावी व दोषींवर तात्‍काळ कारवाई करण्यात यावी तसेच विदर्भातील शिक्षण उपसंचालक (नागपूर / अमरावती), शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), वेतन पथक अधीक्षक (प्राथमिक / माध्यमिक), लेखाधिकारी, गटशिक्षणाधिकारी ही महत्वाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्‍त आहेत. त्‍यामुळे वरील सर्व रिक्‍त पदे पदोन्नती / बदलीने तात्‍काळ भरण्यात यावी, या प्रमुख दोन मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने एक दिवसीय विदर्भस्‍तरीय धरणे / निदर्शने आंदोलन शुक्रवार, दि. २७ जून २०२५ रोजी, दुपारी ४.०० ते ५.०० वाजेपर्यंत शिक्षण उपसंचालक (नागपूर / अमरावती) यांचे कार्यालयासमोर करण्यात येत आहे.

नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील आंदोलन माजी आमदार तथा म.रा.मा.शि. महामंडळ मुंबईचे सरचिटणीस व्‍ही. यू. डायगव्‍हाणे यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील आंदोलन हे विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात करण्यात येणार आहे. प्रांतिय अध्यक्ष अरविंद देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.या धरणे / निदर्शने आंदोलनाला विदर्भातील शिक्षक – कर्मचारी, समविचारी संघटनेचे पदाधिकारी, सदस्‍य यांनी मोठ्या संख्येने उपस्‍थित राहावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विजय ठोकळ, जयदीप सोनखासकर, विगागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, जिल्‍हा, महानगर, तालुका पदाधिकारी, सदस्‍यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे जात प्रमाणपत्र व लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारा वाटप

vishwatmaklokswamivarta

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा,चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा होणार कायापालटकोयना परिसर पर्यटनाचे हब होणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई..

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा-मंत्री डॉ. अशोक उईके