vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय-नेटचे यशस्वी पहिले पाऊल

भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय-नेटचे यशस्वी पहिले पाऊल..

मुंबई, प्रतिनिधी : भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) विकसित केलेले ‘इसीआय-नेट’ (ECINET) हे नवे ‘वन-स्टॉप’ डिजिटल व्यासपीठ नुकत्याच पार पडलेल्या पाच विधानसभा पोटनिवडणुकांत (केरळ, गुजरात, पंजाब व पश्चिम बंगाल) पहिल्यांदाच कार्यान्वित केले. केवळ ७२ तासांत निवडणूक ‘इंडेक्स कार्ड’ प्रसिद्ध करण्याची ऐतिहासिक कामगिरीही या प्रणालीद्वारे शक्य झाली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने ही पुढील पिढीची तंत्रज्ञान–सुविधा आणली आहे. ईसीआय-नेटमध्ये आयोगाच्या ४० हून अधिक पूर्वीच्या वेब व मोबाईल अनुप्रयोगांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे; पुढील काही आठवड्यांत ते सर्व मॉड्यूल्स पूर्णपणे कार्यान्वित होतील.

मतदान टक्केवारी अहवालांत झपाट्याने वेग,या पोटनिवडणुकांत मतदान केंद्राध्यक्ष यांनी (PRO) थेट बूथवरूनच मतदार सहभाग कल (VTR) ट्रेंड्स ईसीआय-नेटवर अपलोड केले. यापूर्वीचा कागदी पद्धतीचा विलंब टाळून, माहिती प्रचंड वेगाने व पारदर्शकपणे सार्वजनिक झाली. PRO यांना बूथ सोडण्यापूर्वीच अंतिम VTR आकडे अपलोड करणे बंधनकारक केल्याने मतदानाची अंदाजित टक्केवारी मतदानदरम्यानच नागरिकांना उपलब्ध झाली.

इंडेक्स कार्ड’ ७२ तासां,५ जून रोजी जाहीर केलेल्या निर्णयानंतर ईसीआय-नेटमुळे इंडेक्स कार्ड तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः डिजिटल झाली; बहुतेक डेटा-क्षेत्रे स्वयंचलितपणे भरली जातात. याआधी ही प्रक्रिया हाताने डेटा भरून सत्यापित करत असल्याने अनेक आठवडे किंवा महिने लागत

१९८०च्या दशकात सुरू झालेले इंडेक्स कार्ड हे मतदारसंख्या, उमेदवार, पक्षनिहाय मतवाटप, लिंगानुसार मतदान, प्रादेशिक नमुने आदी बहुआयामी माहिती देणारे, महत्त्वाचे सांख्यिकीय दस्तऐवज आहे. संशोधक, माध्यमे व सर्वसामान्यांसाठी ते https://www.eci.gov.in/statistical-reports/ येथील ‘bye-elections’ टॅबमध्ये खुले आहे.

ईसीआय-नेटच्या अंमलबजावणीमुळे वेळेची बचत, सुसूत्रता आणि माहितीची पारदर्शकता यांचे नवीन मानदंड निश्चित झाले आहेत. आगामी निवडणुकांत या प्लॅटफॉर्मच्या सर्व सुविधा पूर्ण क्षमतेने वापरल्या जातील, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

000

संबंधित पोस्ट

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

नसरापूर बलात्कार व खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती!

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या भरडधान्यांना आंतरराष्ट्रीय ओळख**‘कोया कृषी कुंभ २०२६’मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम*

vishwatmaklokswamivarta

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta