vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

लातूर, प्रतिनिधी: जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत देवणी येथे गुरुवार, 2 एप्रिल 2026 रोजी जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी पशुधन व कुक्कुट गटांची नोंदणी 2 एप्रिल रोजी प्रदर्शनस्थळी सकाळी 8.30 वाजता सुरु होईल व उद्घाटन ठिक 11 वाजता करण्यात येणार आहे. या पशु प्रदर्शनात देशी गोंवश (देवणी व लालकंधारी), संकरीत गोवंश, उस्मानाबादी शेळी, अश्व व कुकुट पक्षी मोठ्या संख्येने सहभागी होतात.        सर्व पशुपालकांनी आपल्या जातीवंत पशुधनासह या भव्य पशु व पक्षी प्रदर्शनात सहभागी होवून यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवणी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे

असे राहतील पशुधनाचे गट

देवणी नर गट -1) देवणी नर 1 वर्षाखालील वासरे गट 2) देवणी नर 1 वर्षावरील वासरे अदात गट 3) देवणी नर 2 दात वळू गट 4) देवणी नर 4 दात वळू गट

देवणी मादी गट -1) देवणी मादी 1 वर्षाखालील वासरे गट 2) देवणी मादी एक वर्षावरील वासरे गट 3) देवणी मादी गाभण कालवड गट 4) देवणी मादी गाभण गाय गट 4) देवणी मादी दुधाळ गाय दुधाळ गट

      लालकंधारी नर गट -1) लालकंधारी नर 1 वर्षाखालील वासरे गट2) लालकंधारी नर 1 वर्षावरील अदात गट3) लालकंधारी नर 2 दात वळू गट 4) लालकंधारी नर 4 दात वळू गट.5) लालकंधारी नर 6 दात वळू गट

लालकंधारी मादी गट –       1) लालकंधारी मादी 1 वर्षाखालील वासरे गट2) लालकंधारी नर एक वर्षावरील अदात गट 3) लालकंधारी मादी गाभण कालवड गट 4) लालकंधारी मादी गाभण गाय गट 5) लालकंधारी मादी दुधाळ गाय गट

संकरित मादी गट –   1) संकरित मादी 1 वर्षाखालील वासरे गट2) संकरीत मादी एक वर्षाखाली वासरे गट3) संकरित मादी गाभण कालवड गट4) संकरित मादी दुधाळ गाय गट

उस्मानाबादी शेळी गट- तीन व त्यावरील पिल्लांची शेळीअश्व नर गट व मादी गट , अदात, दोन दात वरील,

कुक्कुट गट -1) देशी कोंबडी गट2) विदेशी कोंबडी गट

श्वान गट -वर्गवारी निहाय

*****

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

स्वप्नांना प्रत्यक्षात साकारण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक – पालकमंत्री संजय राठोड रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांचा युवकांशी संवाद

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश

विकसित कृषी संकल्प अभियानाचे-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..             

भुईकोट किल्ल्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा!जिल्हा प्रशासन व लष्कर प्रशासनामध्ये सामंजस्य करार;पर्यटन विकासाला मिळणार नवी गती..

vishwatmaklokswamivarta