vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*

 लातूर, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 25 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिक्षण महर्षी वसंतराव काळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शासकीय आय.टी.आय), औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात पुणे येथील स्वेस कॉर्प लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथील पिप्ती इंजिनिअरींग प्रा. लि., पुणे येथील प्रॉम्प्ट इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस प्रा.लि., सोलापूर येथील कोलब्रो ग्रुप प्रा. लि., लातूर येथील सनरिच ॲक्वा , चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा. लि., श्रीराम फायनान्स लिमिटेड, माहिष्मती सेक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि., फ्यिुजन फायनान्स लिमिटेड या आस्थापना सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय. सर्व ट्रेड, डिप्लोमा सर्व ट्रेड तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना सहभागी होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी बुधवार, 25 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षण महर्षी वसंतराव काळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शासकीय आय.टी.आय), औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इ. (तीन प्रती) सह उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

मौजे कुंभरोशी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” संपन्न..

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी व्यसन मुक्तीचा समुपदेशनपर कार्यक्रम संपन्न

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta