vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न…

सांगली, प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रतिलाल गोसलिया सर्वोदय विद्यालय सांगली येथे माजी न्यायाधीश अॅड. फारुक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO ACT), हुंडा, जातीय भेदभाव, स्त्री भ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक दुष्कृत्यांशी संबंधित कायदेशीर साक्षरता याबाबत कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले.

या कार्यकमप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती सुचेता म्हेतर, विजय कोगनोळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी माजी न्यायाधीश अॅड. फारुक कोतवाल यांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO ACT) याबद्दल मुला-मुलींना माहिती दिली. मुलींनी सर्व क्षेत्रात पुढे यावे, न घाबरता समाजामध्ये आपले स्थान निर्माण करावे असे सांगून मुलींसाठी असलेल्या विविध कायद्याब‌द्दल माहिती दिली. मुला-मुलींनी मोबाईलचा वापर टाळावा, आई, वडिलांचे व शिक्षकांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती नसिमा मुकादम तर आभार नितीन आंबेकर यांनी मानले.

संबंधित पोस्ट

पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

तंबाखूमुक्त पिढीच्या दिशेने जालना जिल्ह्याचे दमदार पाऊल; जिल्ह्यातील 101 शाळा तंबाखूमुक्त*

vishwatmaklokswamivarta

नवदुर्गा वृत्तमालिका भाग 7 कन्या सबलीकरणासाठी शिक्षणाच्या संधी अधिक बळकट

vishwatmaklokswamivarta

जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – पालकमंत्री संजय शिरसाट नाथसागर जलाशयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा थेट गावात जाऊन आढावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांशी थेट संवाद

पीक-विशिष्ट उत्पादन कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आढावा कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ द्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना