vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय; आज 31 डिसेंबरला मद्य विक्री वेळेत शिथिलता अवैध मद्य विक्री, वाहतूक प्रकरणी तक्रार नोंदविण्याची आवाहन…

 नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय; आज 31 डिसेंबरला मद्य विक्री वेळेत शिथिलता अवैध मद्य विक्री, वाहतूक प्रकरणी तक्रार नोंदविण्याची आवाहन…

बुलढाणा, प्रतिनिधी  : नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील विविध भागात अवैध वाहतुक तसेच विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दि. 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तथापि कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्यास अशावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांनादेखील काही तक्रारी असल्यास विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ.पराग मो.नवलकर यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने नववर्षानिमित्त जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या त्यांच्या निर्धारीत वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघड्या ठेवण्याबाबत परवानगी दिली आहे. त्यानुसार एफएल-2,एफएल-4,एफएल, बीआर-2 व सीएल-3 या अनुज्ञप्त्या त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी म्हणजेच दि. 31 डिसेंबर 2024 पासुन एफएल-2, एफएल व बीआर-2 अनुज्ञप्तीला दुसऱ्या दिवशी सकाळी 1 वाजेपर्यंत तर एफएल-3 अनुज्ञप्तीला दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत अनुज्ञप्त्या उघड्या ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री होऊ नये यासाठी संबंधित निरीक्षक, दुय्यम निरीक्षण यांच्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यातील अनुज्ञप्तीधारकांना एकुण 60 हजार विदेशी एक दिवसीय मद्यसेवन परवाने वितरीत करण्यात आलेले आहे. कोणत्याही अनुज्ञप्ती विना परवाना मद्यविक्री चालु असल्याचे आढळल्यास तसेच अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी

नाताळ व नववर्ष आगमनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा कार्यालयाच्यावतीने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रीय अधिकारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा, राज्य उत्पादन शुल्क देऊळगाव राजा व राज्य उत्पादन शुल्क खामगाव व राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांच्याकडून जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकुन कारवाई करणे चालु आहे. तसेच नववर्षाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या, हॉटेल्समध्ये होणारी मद्यविक्री यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे.

गेल्या नऊ महिण्यात 2 कोटी 43 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध विक्री, मद्यनिर्मीती व वाहतुक प्रकरणी दि. 1 मार्च 2024 पासून ते आजपर्यंत विशेष मोहिम राबवून 2 कोटी 43 लक्ष 52 हजार 579 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार 256 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 114 वाहन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे साहेब व विभागीय उप-आयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.शासनाच्या नियमानुसार दारु पिण्यासाठी मद्यसेवन परवाना असणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील परमीट रुम, बीअरबार, वाईन शॉप, देशी दारु दुकानचालक यांना त्याबद्दल सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मद्यसेवन परवाना नसल्यास व्यक्तीला व अल्पवयीन तरुणांना मद्यविक्री केल्यास अनुज्ञप्तीधारकांवार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.0000000

संबंधित पोस्ट

मुंबईतील मंत्रालयात दररोज होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर; प्रेरणा मिळण्यासाठी वाजवली जाणार शिवरायांच्या शौर्याची उद्घोषणा….

vishwatmaklokswamivarta

मुंबई तील पत्राचाळ पुनर्विकासप्रकरण! शिवसेना नेते संजय राऊत यांची आज ED चौकशी…

मराठी फलक : महाराष्ट्रात व्यापार करायचा असेल तर…, सरकारच्या बाजुने हा निकाल….

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवादअपेक्षा, विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत केले आश्वस्त..

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta