vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे आवाहन

 वाहन धारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घेण्याचे आवाहन

 

बुलडाणा प्रतिनिधी,: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने दिनांक 1 एप्रिल 2019 पासून नवीन उत्पादीत होणाऱ्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दि. 1 एप्रिल 2019 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असून वाहन वितरकांद्वारे ही नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट वाहन वितरकांकडून बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे

वाहनाचे नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा करीता झोन 3 मध्ये M/s FTA HSRP Solution Ptv Ltd. ही एजन्सी असून HSRP बुकींग पोर्टल लिंक http://maharashtrahsrp.com हा आहे. या करिता नेमण्यात आलेल्या पुरवठाराची यादी उप प्रादेशिक परिवहन कर्यालयाच्या सुचनाफलकांवर लावण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांना याव्दारे सुचित करण्यात येते की, दि. 1 एप्रिल 2019 पुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांनी HSRP बसविण्याची कार्यवाही त्वरीत करावी. याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा वरील लिंकवर देण्यात आली असून अर्जाचे शुल्क भरणा ऑनलाईन करावा, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात पद भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय तटरक्षक दलआणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई 1800 कोटी रुपयांच्या किमतीचे तीनशे किलो ड्रग्स जप्त…

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके*आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवासुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा

नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न