vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार- मंत्री प्रकाश आबिटकर

एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना; आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार- मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच एस एन सी यू मधील उपचार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

एनआयसीयू व बालकांवरील उपचार या विषयावर आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार बापूसाहेब पठारे, आरोग्य सेवा (प्राथमिक) संचालक डॉ .विजय कंदेवाड तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवजात बालकांच्या उपचारासाठी उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे तसेच महानगरपालिका रुग्णालयांमधील विद्यमान परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील कोणत्याही बालकाला उपचाराअभावी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

बालकांच्या उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरविकास विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाशी योग्य कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना तातडीने पत्र पाठविण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

राज्यातील बालआरोग्य सेवा अधिक सक्षम, प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबविण्यात येतील, असा विश्वासही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अधिकाधिक निधी देऊन दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील- जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील- श्री क्षेत्र आरेवाडी येथे घेतले बिरोबाचे दर्शन- शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली ग्वाही

अहमदपूर येथे १५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत : प्रवीण दरेकर

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..

पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा कुटुंबीयांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर