vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

पदभरती, पदोन्नतीला गती देण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यावर भर दिला.

आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने कोणत्याही स्तरावर दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनातील निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विविध संवर्गांतील रिक्त पदांचा यावेळी आढावा

आरोग्य विभागातील गट-क व गट-ड संवर्गातील नवीन पदभरतीच्या सद्यस्थितीचा, तसेच विविध संवर्गांतील रिक्त पदांचा यावेळी आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पदभरतीची प्रक्रिया अनावश्यक विलंबाविना पूर्ण करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करा

अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, परिविक्षाधीन कालावधीची पूर्तता, पदोन्नती आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव अनावश्यक प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन पदोन्नतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालात योग्य संधी आणि पदोन्नती मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कर्मचाऱ्यांच्या समावेशनासंदर्भातील बाबींचाही आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा नियमांनुसार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

फाईलचा प्रवास जलद करा,कोणत्याही प्रकरणात अनावश्यक विलंब होणार नाही, यासाठी प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित करून कामकाज करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या कर्तव्य व जबाबदारी निश्चितीबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गातील हिवताप कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने नियुक्ती देण्यासंदर्भातील कार्यवाहीबाबतही चर्चा करण्यात आली

चांगल्या कामाला प्रोत्साहन, हलगर्जीपणावर कारवा,आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षमतेने काम करणे अपेक्षित आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे; मात्र कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मंत्री आबिटकर यांनी दिले.

बैठकीस आरोग्य विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकितील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

00000000

संबंधित पोस्ट

इलेक्ट्रिक ट्रक’ निर्मितीसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना,महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुपा येथे आगमन व स्वागत…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यायोजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रीमियर शो’