vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता 17 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परदेशात शिक्षण घेणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील शिक्षण घेणाऱ्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करावेत. अर्ज दि. 17 मे 2025 सायंकाळी 6.15 वाजेपर्यत समक्ष किंवा पोस्टाने इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे येथे सादर करायचे आहेत. यासाठी अनुदानित, विनानुदानित व कायम विनाअनुदानित अशा सर्व विद्यालये/महाविद्यालये यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.

   विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएच डी या अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) Ranking 200 च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेतील अशा 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेश शिष्यवृत्ती या योजनेकरिता अर्ज करता येईल. जास्तीत जास्त विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in किंवा https://obcbahujankayan.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अर्जाचा नमुना, शासन निर्णय या बाबत दिलेल्या माहिती पहावी, असे इतर मागास बहुजन कल्याण सांगली च्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

केंद्रात मोदी सरकारने ११ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने धारावी विधानसभा संकल्प सभेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

vishwatmaklokswamivarta

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ  भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध – जिल्हाधिकारी दिलीप स्वामीश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा..

विद्यार्थ्यांनी बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावे – राज्यपाल हरिभाऊ बागडे

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta