vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रीमियर शो’ 

पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रीमियर शो’

मुंबई प्रतिनिधी-

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनी संयुक्तपणे निर्मित ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रीमियर शो’ झाला.

या ‘प्रीमियर शो’साठी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, उपसंचालक वर्षा आंधळे आदी उपस्थित होते.

हा माहितीपट पंढरपूर वारीची प्रत्यक्ष अनुभूती देतो. या चित्रपटातगृहामध्ये जणू काही पंढरपूरची वारी प्रत्यक्षात उतरली असल्याचेही अनुभव येत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

 

▶️ थोडक्यात माहितीपट…’पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा २२ मिनिटांचा माहितीपट वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या सहकार्याने तयार केला आहे. या माहितीपटाचे मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करुन त्याचे डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विविध भाषांमधील माहितीपटाचे प्रसारण डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, अ‍ॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो अशा ९ वाहिन्यांवरुन करण्यात येत आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

हरियाना सरकारच्या धर्तीवर निवृत्ती वेतन मंजूर करा अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन करणार – बाबासाहेब कोलते

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा – मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आताप्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी..

vishwatmaklokswamivarta

जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे