vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तंबाखूमुक्त पिढीच्या दिशेने जालना जिल्ह्याचे दमदार पाऊल; जिल्ह्यातील 101 शाळा तंबाखूमुक्त*

*तंबाखूमुक्त पिढीच्या दिशेने जालना जिल्ह्याचे दमदार पाऊल; जिल्ह्यातील 101 शाळा तंबाखूमुक्त*

 

जालना, प्रतिनिधी: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) जिल्हा रुग्णालय अंतर्गत जालना जिल्ह्यात ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाला शाळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत जिल्ह्यातील 101 शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निर्धारित निकष पूर्ण केले असल्याचे जिल्हा रुग्णालय जालना यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये तंबाखूविरोधी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये तंबाखूमुक्त शाळेसाठी निर्धारित 9 निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांचा आढावा घेऊन त्यांना तंबाखूमुक्त करण्यात येत आहे. यासाठी 10 ते 16 ऑगस्ट 2026 दरम्यान प्रथम जिल्हास्तरीय सर्व तालुका शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व विस्तारअधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांची कार्यशाळा घेऊन, यामध्ये शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर व विक्री होणार नाही याची दक्षता, तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करणारे फलक, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती, तंबाखूमुक्तीची शपथ तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग यासारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार’ हा संदेश पोहोचविण्यात येत आहे. शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रम, शपथविधी तसेच तंबाखूविरोधी संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी एप्रिल 2026 ते आजपर्यंत 101 शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असून हा उपक्रम येथेच थांबणार नसून पुढील काळात जिल्ह्यातील आणखी शाळांचा तंबाखूमुक्त शाळा अभियानात समावेश करण्यात येणार आहे. संबंधित शाळांना निर्धारित निकषांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.

तंबाखूचे सेवन सुरू होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, ‘तंबाखूमुक्त शाळा – तंबाखूमुक्त परिसर तंबाखूमुक्त पिढी’ या संकल्पनेच्या दिशेने जालना जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भावी पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 

*****

संबंधित पोस्ट

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या**पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन*

दुष्काळाच्या संभाव्य स्थितीवर जिल्हास्तरीय आढावा;पीक पेरा नोंदी, पाणी व चारा टंचाईचे सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

vishwatmaklokswamivarta

गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

नवी मुंबई महानगरपालिका 23 शाळांचा निकाल 92.19% – महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश…नमुंमपा सानपाडा शाळेचा विद्यार्थी अभिराम राऊत 94.40% गुण संपादन करीत महापालिका शाळांमध्ये सर्वप्रथम..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर