vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

लातूर, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लातूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्रमांक-१ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पहिले शिबीर हरंगुळ महसूल मंडळात शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता मौजे टाकळी शि. येथे आयोजित करण्यात आले आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी आज आढावा घेतला. सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या शासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिरात विविध १६ विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये महसूल व पुरवठा विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न, जात, रहिवासी आणि राष्ट्रीयत्व, प्रमाणपत्र क्रिमिलियर इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप. नवीन रेशन कार्ड वितरण, रेशन कार्ड दुरुस्ती आणि ई-केवायसी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत ॲग्री स्टॅक, फार्मर आयडी मधील त्रुटी दूर करणे, बी-बियाणे व खतांची माहिती आणि पशुधनाचे लसीकरण आदी सेवा, तर पंचायत समिती मार्फत विहीर साठी अर्ज, इत्यादी व आरोग्य विभागामार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि साथरोगांबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच यावेळी पीक कर्ज वाटपाबाबत मार्गदर्शन, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची माहिती, वनसंवर्धन आणि महावितरणच्या वीज कनेक्शनबाबतच्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.

प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होणार

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ माहिती न देता, नागरिकांकडून विविध योजनांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. तसेच या अर्जांवर तातडीने कार्यवाही केली जाईल. भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीचे नकाशे व मोजणी अर्जाची सुविधा असेल, तर हरंगूळ बु. मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सातबारा उतारा वाटप आणि प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ कार्यरत राहील. टाकळी शि. आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता या शिबिराला उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौदागर तांदळे तहसीलदार लातूर यांनी केले

***

संबंधित पोस्ट

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद..

कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी..

.उत्तर भारतात झालेल्या मोठ्या हिमवृष्टीमुळे आणि पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात आता कडाक्याच्या थंडीची चाहूल…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण

जन विश्वास विधेयक, 2026′ संसदेत मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले समाधान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप