vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी,सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी,सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक

 

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ११(१) आणि ५९(१) नुसार, सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पहिली बैठक २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड १६ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. तसेच, लातूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक ९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.

लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी लातूरच्या अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, लातूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात येणार असून, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडणूक प्रक्रियेसाठी संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना आवश्यक नोटिसा निर्गमित केल्या असून, सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांनी केले आहे.*****

संबंधित पोस्ट

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अलिबाग येथे ‘जागो ग्राहक जागो’ पथनाट्याद्वारे जनजागृती

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर नवीन महायुती सरकारचा पहिला तर अजित पवारांचा ११ वा अर्थसंकल्प

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे रविवार २८ जून रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणुक; 21 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले