vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी: गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.सदस्य डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात 50 एमबीए क्षमतेचं उच्चदाब रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे संयंत्र मोठे असल्याने लगेचच नवीन रोहित्र उपलब्ध करून देता आले नाही. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना म्हणून 25 एमबीए क्षमतेचे रोहित्र बसवण्यात आले आहे. मात्र यामुळे काही प्रमाणात विजेचा विस्कळीत पुरवठा होत आहे. हे लक्षात घेऊन नवीन 50 एमबीए क्षमतेचं रोहित्र बसवण्याचे काम सुरू असून ते 22 जुलैपर्यंत ते पूर्ण होईल.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून देवरी येथे 100 एमबीए क्षमतेचे नवीन ईएचव्ही सबस्टेशन उभारण्यात येत आहे. त्यासोबतच दुसरे एक ईएचव्ही सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून 30 जुलैपर्यंत वर्क ऑर्डर दिली जाईल. पुढील दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

त्याचबरोबर आमगावमध्ये डिसेंबरपर्यंत एक नवीन कॅपेसिटर बँक उभारण्यात येणार आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होईल आणि वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या सुटेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.000

संबंधित पोस्ट

कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेचे काटेकोर नियोजन करावे – दीपेंद्र सिंह कुशवाह

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात– जिल्हाधिकारी किशन जावळे

दुबईत युद्धजन्य तणाव; हजारो भारतीय अडचणीत – केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी : खासदार डॉ. कल्याण काळे

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

सतीश घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश : चित्रवडगावातील शेतरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

नांदेड तालुका महसूल प्रशासनाचा “शोध वंचित लाभार्थ्यांचा” विशेष उपक्रम30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन