vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, : प्रतिनिधी राज्यातील शाळांमध्ये बेकायदेशीर शुल्कवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण विभाग लवकरच नियमांमध्ये सुधारणा करणार आहे. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम, २०११ च्या कलम ३ नुसार कोणतीही शाळा मान्यता शुल्कापेक्षा अधिक रक्कम पालकांकडून आकारू शकत नाही. असे केल्यास संबंधित शाळेविरोधात कारवाई केली जाते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य योगेश सागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, शुल्कवाढ विरोधात पालकांकडून आलेल्या तक्रारींवर चौकशी करून त्यानुसार संबंधित शाळांविरोधात कारवाई केली जाते. अधिनियमानुसार प्रत्येक शाळेत पालक-शिक्षक संघ स्थापन करणे बंधनकारक असून, त्या संघातील कार्यकारी समितीच शुल्कवाढीबाबत निर्णय घेते. मात्र, सध्याच्या तरतुदींमध्ये काही सुधारणा आवश्यक असल्याने शिक्षण विभागाने त्याचा अभ्यास सुरू केला आहे. शिक्षण हा व्यवसाय नसून सामाजिक बांधिलकीचे कार्य आहे. कोणीही गरजेपेक्षा जास्त शुल्क आकारू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

०००

संबंधित पोस्ट

शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नवी मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांनी घेतले शुध्दलेखनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद : शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नी शिवसैनिकांची तहसिलकार्यालयावर धडक : लबाड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांची घोषणाबाजी…