vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी औट्रम घाटातील वाहतुक सुलभ करण्यासाठी करावयाचा भुयारी मार्ग, शहरात घरगुती गॅस साठी करावयाची पाईप लाईन व गॅस वितरण, छावणी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अशा विविध विषयांचा आढावा आज खासदार डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले. व्यवस्थापक संघर्ष, जी. राममोहन, भारत पेट्रोलियमचे अक्षय वढवा, मनोज जाधव, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.छत्रपती संभाजीनगर शहरात तसेच औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना लागणारा गॅस हा पाईपलाईन द्वारे करता यावा यासाठी प्रकल्प सुरु आहे. त्याचा आढावा घेण्यात आला. शहरातील १० झोन पैकी पहिल्या टप्प्यात ४ झोन मध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात किमान १० हजार घरांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.

 

तसेच औट्रम घाटात राष्ट्रीय महामार्गासाठी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. रेल्वेलाईन साठी व महामार्गासाठी भुयारी मार्ग करण्याबाबत आढावा घेण्यात आला. यासाठी रेल्वे विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी स्वतंत्रपणे प्रकल्प अहवाल तयार करावा,अशी सुचना देण्यात आली.

शहरातील छावणी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या बंगला क्रमांक ९ येथे स्मारक करण्याबाबत कॅन्टोनमेंट कडून परवानगी मिळाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याच सोबत वेरूळ येथे मालोजीराजे गढी, शहाजीराजे स्मारक तसेच घृष्णेश्वर मंदिर परिसरातील अहिल्यादेवी कुंड याबाबतही आढावा घेण्यात आला.

०००००

संबंधित पोस्ट

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा! मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..

घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये समर्थन संस्थेच्या वतीने दिव्यांग आणि आर्थिकदृष्टया दुर्बळ युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी १५ दिवसांत कृती आराखडा सादर करा – मंत्री दादाजी भुसे इगतपुरी नगरपरिषद आढावा बैठक

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी अनुसूचित जातींच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी डिजिटल माध्‍यमातून अधिक बळकट करण्यासाठी ‘पीएम-अजय’ पोर्टल आणि ‘अजय’ मोबाईल ॲपचा केला प्रारंभ

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in