vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा! मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा!
मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..

जालना/प्रतिनिधी
महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले की, महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाजातील सर्व गोरगरीब घटकांसाठी मागासवर्गीय भटके, विमुक्त जाती यांच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. व मानवता जपण्याचे कार्य केले. तसेच पिण्याच्या पाण्याचा विहिर सर्वांसाठी खुली केली. मुलींची शाळा काढली. व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षक बनविले. व फातेमा शेख या पहिल्या मुस्लीम शिक्षीका त्यांच्यासमवेत होत्या. यामुळे महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, सचिव सुरेश मानकस, उपाध्यक्ष सुरेश रत्नपारखे, सहसचिव ॲड. रामेश्‍वर खांडेभराड, वैजीनाथ नागरे, नकुल पराये, मंगेश घुगे, दत्ता खांडेभराड यांनी केली आहे.
याबबतचे निवेदन राष्ट्रपती द्र्रोपती मुरमू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री आजितदादा पवार, मा.ना. अतुल सावे, पालकमंत्री पंकजाताई मुंडे , सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना पाठविले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. 

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी-उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

जीवन सुकर करण्यासाठी परिपूर्ण कौशल्य आत्मसात करणे आवश्यक- जिल्हाधिकारी अशोक काकडे- बालगृह, निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक प्रशिक्षणाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2025 परीक्षा आवेदनपत्रासाठी 3 ऑक्टोबरची मुदत

vishwatmaklokswamivarta