vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नीरा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम

नीरा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, प्रतिनिधी : नीरा उजवा कालवा १०० वर्षांहून अधिक जुना झाला असून, त्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, नीरा उजवा कालवा जुना असल्याने त्याचे विविध ठिकाणी स्ट्रक्चरिंग करण्यात आले आहे. जलसेतूच्या भिंतीमधून पाणी गळती सारख्या घटना टाळण्यासाठी कालव्याचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. यासोबतच पूर्णतः लायनिंग करणे, कालव्याची वहन क्षमता वाढविण्याची शक्यता तपासण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन जलसेतूची तातडीने दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. तरीदेखील पुन्हा तपासणी करून नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी मिळावे, ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट,कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा..