vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

        सांगली, प्रतिनिधी : सर्वसामान्यांसाठी केंद्र आण राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र, गरजू आणि वंचितापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

      सांगली जिल्ह्यासाठी नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्पअंतर्गत पालकमंत्री कार्यालय (जीएमओ) हेल्पलाईनचे उद्‌घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, दीपक शिंदे म्हैसाळकर, संग्राम महाडिक, निशिकांत पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

     ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित सांगली जिल्हा’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री कार्यालय (जीएमओ) हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना जलद व सुलभ पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्याबाबत मार्गदर्शन करणे, जिल्हा स्तरावरील तक्रारींचे त्वरित निवारण करणे व विविध शासकीय विभागांत समन्वय साधून सेवा अधिक गतिमान करण्याचा संकल्प स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करण्यात आला. पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8806088064 असून ई मेल helpline@gmosangli.in असा आहे. तसेच https://gmosangli.in/ या संकेतस्थळावरून यामध्ये सहभागी होता येईल. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्याशी समन्वय ठेवून या हेल्पलाईनचे कामकाज करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

vishwatmaklokswamivarta

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती,वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती

महाराष्ट्र राज्य सर्व राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर   जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने 

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा…