vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- यंदाचे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे

गौरव गाथा संविधानाची या कार्यक्रमाची संकल्पना ॲड आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन डॉ.किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. पी.एन.पी. नाट्यगृह अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ दोन दिवस रोजी सायंकाळी ६ः३० ते १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. दिनांक १६ आक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रग्रंथ – आधारस्तंभ लोकशाहीचा हे प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर लिखित कुमार सोहोनी दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. तर दिनांक १७ आक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ः३० ते १० या वेळामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप थेटर प्रस्तुत गौरवगाथा संविधानाची हा कार्यक्रम एकच राजा येथे जन्मला फेम गायक रोहित पाटील, योगेश काळबेरे, अलिबागचा कुलाबा किल्ला फेम गायीका रेश्मा पाटील, ज्ञानराज पाटील, प्रतीक नाईक, आशुतोष पोटे, राजेंद्र जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेला भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय श्री विभीषण चवरे यांनी9

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

vishwatmaklokswamivarta

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

२९ व्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या साथीने  सोनिया चौगुलेंच्या कार्वी ब्रँडची यशस्वी वाटचाल

वारणा धरणात 28.73 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 21824 क्युसेक्स तर वारणा धरणातून 11960 क्युसेक्स विसर्ग सुरू

शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*