vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

मुंबई, प्रतिनिधी- आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी आग्रा येथील या जागेचे अधिग्रहण व संबंधित प्रक्रिया राबविण्याकरिता उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी ‘समन्वयक’ म्हणून पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला ३९५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, त्या ऐतिहासिक स्थळावर महाराष्ट्र शासनामार्फत भव्य स्मारक उभारले जाणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी आवश्यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, असेही सांगितले होते.

या स्मारकाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागाला नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आग्रा येथील शिवरायांच्या मुक्कामाच्या जागेचे अधिग्रहण व संबंधित प्रक्रिया राबवण्यासाठी उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी राजजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा येथील मुक्काम हा स्वराज्याच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे. त्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक उभारले जाणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस· आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य सेवांचे निकष सुधारणार

vishwatmaklokswamivarta

ऑरिक स्मार्ट सिटीने औद्योगिक उत्कृष्टता आणि परिवर्तनाची सहा वर्षे केली साजरी विविध प्रकल्पांमुळे 71,343 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह, 62,405 रोजगारांचीही निर्मिती होणार बिडकिन औद्योगिक क्षेत्रात 49 सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योग, 27 मोठे प्रकल्प आणि 4 बिगर सूक्ष्म – लघु आणि मध्यम उद्योगांना भूखंडांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

दिल्लीमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत..

प्री, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta