vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत..

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साही स्वागत..

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील महत्वाचा क्षण असून हे क्षण संस्मरणीय व्हावेत यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. या निमित्ताने महापौरांसह सर्व पदाधिकारी, नगरसेवक तसेच महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी विविध शाळांमधील प्रवेशोत्सोत्सव समारंभप्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

          नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक आणि 23 माध्यमिक अशा 80 शाळांमध्ये सोमवार, दि. 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष ‘शाळा प्रवेशोत्सव’ निमित्त विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुले आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाणार आहे.

          प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात पालकांचा सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. या निमित्ताने महापालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

          शाळांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा असल्याचे लक्षात घेत विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले असून शाळा परिसर आकर्षकरित्या सजविण्यात येत आहे. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

          या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी व शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल, त्यांचा शाळेतील पहिला दिवस आनंददायी होईल आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे आणि शिक्षणाधिकारी श्री.अशोक कडुस यांनी व्यक्त केला आहे.0000

संबंधित पोस्ट

महाप्रीतने कालबद्ध पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवावा मस्त्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न**साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प**- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

शासकीय निवासी शाळेसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन..

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक

महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना – निवासी आयुक्त श्वेता सिंघल