vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एमबीबीएस वैद्यकीय  शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

एमबीबीएस वैद्यकीय  शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

आरोग्य प्रतिनिधी –

वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने 2025-26च्या शैक्षणिक वर्षासाठी नीटच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता तिसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी देशभरात एकूण दोन हजार सहाशे पन्नास नव्या एमबीबीएस जागांना मान्यता देण्यात आली आहे. या वाढीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता वाढली आहे.

हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू या राज्यात प्रत्येकी तीनशे जागांची वाढ झाली आहे. तर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोनशे पन्नास जागांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण दीडशे नव्या जागांना मान्यता मिळाली आहे.

या जागा तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे.

यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने तिसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लांबणीवर टाकले आहे. तसेच नव्याने मान्यता मिळालेल्या जागांचा समावेश या फेरीत करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…

महिलांसाठी आता जिल्हास्तरावर ‘पीसीओडी क्लिनिक’ सुरूमहिलांच्या हार्मोनल व प्रजनन आरोग्य समस्यांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta

सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन उत्साहात साजरा

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध; औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

कर्करुग्ण निदान वाहनाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta