vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

 राज्य प्रतिनिधी -भारतात आज अवयव दानाचे प्रमाण फक्त 0:28℅ऐवढे कमी आहे. कारण याबाबत समाजात खूप अज्ञान आहे. देहदान अवयव दानाच्या संदर्भातील भ्रम, भिती व अंधश्रद्धा दूर करून देहदान, अवयव दानाचे वास्तव समाजाच्या लक्षात आणून द्यायचे असतील तर हा विषय सर्व विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे अभ्यास मंडळावर काम करणाऱ्या मंडळींनी याचा विचार केला पाहिजे असे आवाहन देहदान समिती मेडिकल कॉलेज, नागपूरचे सं माननीय सदस्य प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांनी केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई येथे मानसशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ” देहदान, अवयव दान:- भ्रम आणि वास्तव ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

      पुढे बोलताना ते म्हणाले की, देहदान अवयव दान हा मनुष्य जगविणारा विषय आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी ला अभ्यास, व संशोधनासाठी मानवी मृतदेहच मिळाले नाहीत तर त्यांच्या पदवी चा दर्जा कसा असेल?भविष्यात त्याच्या हातून घडणारी रुग्ण सेवा कोणत्या दर्जा ची असेल

याचा विचार होणे गरजेचे आहे.

        आपल्या देशात वेळेवर अवयव मिळाला नाही म्हणून दरवषी लाखो लोक अकाली मरतात. तरी कोणी याकडे लक्ष देत नाही म्हणून अवयव दानाचा टक्का वाढत नाही. त्यामुळे आता शिकल्या सवरल्या लोकांनी देहदान अवयव दान जनजागृतीची पताका आपल्या खांद्यावर घेण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन डॉ सुशील मेश्राम यांनी केले.यावेळी मानसशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. निलेश ठाकरे यांनी सुद्धा देहदान अवयव दानाचे मानवी जीवनातील

 महत्व प्रतिपादन केले. ते म्हणाले की, हा आपल्या देशातील नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. जनजागृती करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. आम्ही आमच्या विद्यापीठात वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासक्रमात देहदान अवयव दान या विषयाला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. या चळवळीला समाजातील शेवटच्या माणसा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करु. देशाप्रती असलेले आपले उत्तर दायित्व पूर्ण करण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न रत राहू असे प्रतिपादन डॉ निलेश ठाकरे यांनी केले.

  कार्यक्रमाला एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचया अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष च्या संचालिका डॉ. प्रज्ञा वाकपैंजण तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रेखा चव्हाण यांनी व आभार प्रदर्शन डॉ.सुभाष चव्हाण यांनी केले.

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर’ कार्यक्रमाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहितीआपत्कालीन प्रतिसादासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याच्या सूचना…

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतसहभागी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अनिवार्य..