vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

मुंबई, प्रतिनिधी :- बोगस औषध खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. बोगस औषधी खरेदीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली केली होती. या चर्चेत सदस्य नाना पटोले, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, याप्रकरणी केलेल्या तपासामध्ये मे. मिनिस्टल कॉम्बिनेशन ही उत्तराखंडची औषधे कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. या उत्पादकांनी उत्पादित केलेल्या औषधांचा साठा विश्लेषणार्थ घेऊन चाचणी करण्यात आली. चाचणीअंती या कंपनीकडून उत्पादित औषधे बनावट असल्याचे आढळून आले. या बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या पेढ्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. या पेढ्यांचे परवाने 30 सप्टेंबर 2024 पासून रद्द करण्यात आले आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या चर्चेच्या उत्तरात सहभाग घेताना सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

बुलढाण्यात जिल्हास्तर युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

बोखारा ग्रामपंचायतीतील  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यातून समाजविकासाला बळ : जय हनुमान मित्र मंडळाचा उपक्रम उत्साहात

vishwatmaklokswamivarta