vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनमेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी..

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनमेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी..

          अमरावती, प्रतिनिधी : युवा पिढीला कृत्रिम बुद्धीमत्ता आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध कौशल्य आत्मसात करता यावे तसेच त्यांना गती असणाऱ्या क्षेत्रात पुढे घेवून जाण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले. मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

              नवराष्ट्र युथ फाऊंडेशनच्या वतीने येथील सायन्स कोर मैदानावर आयोजित तीन दिवशीय ‘अमरावती युवा महोत्सवा’चे आज उद्घाटन पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे आणि प्रवीण तायडे, नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील, ह.भ.प. प्रशांत महाराज ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

             पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, युवा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींची प्रतिभा, सर्जनशिलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडणार आहे. अमरावती व विदर्भाच्या मातीचे संस्कार त्यांच्या सादरीकरणातून दिसून येतील. यासोबतच ज्ञान, तंत्रज्ञान व कल्पकतेच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या उभारणीतही हे युवा आपले योगदान देणार आहेत. राज्य शासनाने एआय बेस तंत्रज्ञानावर भर दिला असून युवकांना या क्षेत्रात पुढे जाण्याकरिता पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. अमरावती व राज्यातील युवकांनी यादृष्टीने पुढाकार घ्यावा त्यास राज्यशासन पूर्ण सहकार्य करेल असे सांगत एआयच्या सद्उपयोगावर भर देत दुरुपयोगापासून लांब रहावे असेही त्यांनी सांगितले. येत्या 25 डिसेंबर रोजी चिखलदरा येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मेळघाट महोत्सवात युवाकांना सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यकरण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    नवराष्ट्र युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष हिमांशु पाटील यांनी प्रास्ताविक केले. 23 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या युवा महोत्सवामध्ये दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6.30 दरम्यान शिक्षणतज्ञांचे व्याख्यान, युथ पार्लमेंट, गरबा नाईट, स्टार्टअप एक्सगो स्पर्धा, अमरावती गॉट टॅलेंट आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

महाड क्रांतीभुमीत भिमसृष्टी उभारण्यात यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  *चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले विनम्र अभिवादन* 

वाचनानंदाची दिवाळी; शासकीय विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

छत्रपती शिवरायांना मानवंदना देत ‘दुर्गोत्सव’ या प्रेरणादायी उपक्रमात सहभागी होण्याचे महाराष्ट्र शासनाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प”-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

न नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद ! अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते