vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू

शहरात प्रतिबंधात्मक कलम 37 (1) व (3) लागू

 

अमरावती, प्रतिनिधी : ईद-ए-मिलाद,नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी, दहीहंडी, कावड यात्रा व इतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 37 (1) व (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत

प्रतिबंधात्मक आदेश पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून सदर आदेश दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत मेळावे, मिरवणुका आयोजित करण्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लेखी परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी करण्यात आली आहे. शासकीय- निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, अंत्ययात्रा, शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना हे आदेश लागू राहणार नाहीत. या आदेशाचा भंग करणाऱ्यां विरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्तालयाने कळविले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्जाची 17 जुलैपर्यंत अंतिम मुदत…

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta

तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन

कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल – जिल्हाधिकारी अशोक काकडे  मूकबधीर विद्यार्थ्यांसाठीच्या 15 दिवसीय प्रशिक्षणाची सांगता.- राज्यातील पहिला उपक्रम

डाक विभागाची सांगलीत 19 डिसेंबरला पेंशन अदालत

vishwatmaklokswamivarta

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन