vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन-विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

सेवा संकल्प अभियानांतर्गत चित्ररथाचे उद्घाटन-विविध योजनांच्या प्रचार-प्रसारासह महिला सक्षमीकरणासाठी लाभार्थ्यांना धनादेश वाटप

रायगड, प्रतिनिधी-सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध शासकीय लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन आज दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रायगड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.सदर चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहा भोसले (भा.प्र.से.), वैकुंठद पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद रायगड, प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), रायगड, तसेच श्रीमती पवार, पंचायत समिती आदिवासी गण सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.

या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासात्मक उपक्रम आणि लाभाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात येणार असून, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण अभियान,याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण व सबलीकरण अभियानांतर्गत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या अभियानांतर्गत दोन महिला बचत गट तसेच पाच वैयक्तिक लाभार्थी यांना विविध उपक्रमांसाठी धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे आणि महिला व बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, लाभार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार- मंत्री आदिती तटकरे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उल्हासनदीची केली पाहणी-‘वीड टू वेल्थ’ या प्रकल्पामार्फत जलपर्णी पासून तयार करणार शोभेच्या वस्तू..

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

वनार्टी तर्फे मोफत प्रशिक्षण; ऑनलाईन अर्ज भरण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-2025 जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित· जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत संपन्न

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका चषक पर्यावरणपूरक व प्लास्टीकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा 2025-26 चे आयोजन