vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

राज्य प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष पोलीस संघांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.‘महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धे’चे यजमानपद यावेळी मुंबईला मिळाले आणि यजमान संघाने पुरुष व महिला दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट संघांचा पुरस्कार पटकावला, त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून, उत्कृष्ट पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाकडे पाहिले जाते, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. तसेच महाराष्ट्र पोलीस दल आधुनिकता व तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र ही देशाची आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे. मात्र, येथील कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. जिथे कायद्याचे राज्य असते, तिथे समृद्धी येते आणि ते कायद्याचे राज्य टिकवण्याची जबाबदारी पोलीस दलावर असते. म्हणूनच महाराष्ट्र पोलीस दलाचे अभिनंदन

पुढील काळात गुन्हेगारी क्षेत्रातील आव्हानेही बदलत आहेत. सायबर क्राइम, नार्कोटिक्स अशा प्रकारची नवी आव्हाने समोर येत आहेत. अशा वेळी कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्यावर मात करून, सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस दलावर असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

00000

संबंधित पोस्ट

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे.अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदासाठी 18 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू, ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास-राज्यमंत्री माधुरी मिसाळoj

माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातूनखरेदी विक्रीची साखळी उभारणार- पणन मंत्री जयकुमार रावल

भटक्या श्वानांबाबत जाहीर आवाहन

vishwatmaklokswamivarta