vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पनवेलमधील कातकरी वस्तीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट ; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा”*

“पनवेलमधील कातकरी वस्तीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट ; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा”*

पनवेल प्रतिनिधी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कातकरी समाजाच्या वस्तीवर प्रत्यक्ष भेट दिली व त्यानंतर पनवेल महानगरपालिका कार्यालयात बैठक घेतली.

     पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 538A येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्कांबाबत ही क्षेत्रभेट व बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री अशोक वुईके यांनी महापौर नितीन पाटील आणि आदिवासी विकास विभाग ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांच्या समवेत आदिवासी वस्ती येथे भेट दिली. परिसराची पाहणी करून महसूल विभाग व पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी तेथील समाजमंदिरामध्ये बैठक घेऊन कातकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

      यानंतर पनवेल महानगरपालिका मुख्यालयात पनवेल महानगरपालिका आयुक्त व अधिकारी, आदिवासी विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित प्लॉटवरील कातकरी समाजाच्या मालकी हक्काबाबत चर्चा झाली असता महापालिकेकडून या विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे पनवेल महापौर नितीन पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजनेअंतर्गत 116 प्रस्ताव आदिवासी विकास विभागास मनपा कडून सादर करण्यात आले असून विविध शासकीय योजनांचा लाभ सर्व पात्र आदिवासी बांधवांना पुढील 3 महिन्यांत मिळेल यासाठी प्रयत्न करू असे मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1680 आदिवासी कुटुंबे आणि 20 आदिवासी वस्त्यांचा आढावा घेण्यात आला.

      आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम जनमन योजना, राणी दुर्गावती योजना व विविध कल्याणकारी योजनांची पनवेलच्या शहरी भागातील अंमलबजावणीची व सध्यस्थीतीची माहिती यावेळी मंत्री डॉ अशोक वुईके यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेऊन याबाबत सूचना दिल्या. शहरी भागातील आदिवासी समुदायकडे दुर्लक्ष होणार नाही, त्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविले जातील तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

   यावेळी बैठकीस पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासन बळीराजाच्या खंबीरपणे पाठीशी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मालेगाव तालुक्यातील अमानी येथील शेतकऱ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

निवडणूक आयोग लवकरच एकल बिंदू ॲप सुरू करणार सुधारित युजर इंटरफेस व युजर एक्स्पीरियन्स सोबत ४० हून अधिक आयटी ॲप समाविष्ट करण्यात येणार

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमन केंद्र उपयुक्त ठरेल- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अग्निशमन केंद्र, कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथील त्यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. 

vishwatmaklokswamivarta