vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वरसोली येथे पाठांतर स्पर्धा संपन्न

वरसोली येथे पाठांतर स्पर्धा संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत) अलिबाग आणि उद्यम सखी संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रामजी देवस्थान,रामनाथ,वरसोली अलिबाग येथे ६ ते १० आणी ११ ते १८ या वयोगटातील अमृत वर्गामध्ये येणाऱ्या मुलांसाठी एक पाठांतर स्पर्धा (रविवार दि. ५ एप्रिल २०२६) रोजी संपन्न झाली.

मुलांमधे भारतीय संस्कृतीच्या,हिंदू धर्माच्या,भारतीय राष्ट्रीयत्वाच्या संस्कारांची रुजवात होणं व त्यांचं संवर्धन होणं,त्याच बरोबर ईशभक्ति निर्माण होणं यासाठी अमृत संस्था गेल्या काही महिन्यांपासून मुलामुलींच्या संघटनासाठी प्रयत्नशील असून नियमितपणे त्यांच्यात परस्पर सामंजस्य,सलोखा,सहकार्य निर्माण होण्यासाठी काही बैठे/मैदानी खेळ,स्तोत्रपठण इ.कार्यक्रम राबवीत असते.

या उपक्रमाला स्थानिकांकडून उत्साहवर्धक म्हणता येईल असा प्रतिसाद मिळत असून त्याचंच दृश्य स्वरूप म्हणजे नुकतीच आयोजित केलेली स्पर्धा होय. या स्पर्धेत अमृतचे श्री.शैलेश वि.मराठे यांनी पुढाकार घेतला होता. तसंच उद्यम सखी संस्था अलिबाग यांच्या सौ.प्रार्थना दामले नागवेकर अलिबाग यानी त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले. रामजी देवस्थानच्या विश्वस्तांनीसुद्धा मोठ्या आपलेपणानं या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. अनघा मराठे, कुमारी जान्हवी पाटील,सौ प्रणिता म्हात्रे यांनी काम पाहिले.

००००००००

संबंधित पोस्ट

राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

यलो अलर्ट; सोजिल्ह्यातसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य-उपमुख्यमंत्री अजित पवार औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय, संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक सनदीची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती · शासन परिपत्रक जारी ; उद्योग घटकांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता