vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन सुविधा*शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी: शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा कृषी विभागामार्फत दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षीपासून या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    राज्य शासनातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मची डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देण्यात येतात.

यापूर्वी कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी ऑफलाईन पद्धती होती. यात इच्छुक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्यासाठी कृषी विभागातर्फे पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरस्कारासाठी एकदा अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा देण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच अर्जाच्या टप्प्याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. कृषी आयुक्त यांनी सन २०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याच्या सूचना केल्या आहे.

 पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी कृषी पुरस्कार सन २०२५ करीता संकेतस्थळावरील कृषी पुरस्कार टॅबद्वारे तात्काळ अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी आवाहन केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश : महाराष्ट्राचा अभिमानडॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणी,मतदार पडताळणीसाठी 25 ते 27 मार्चपर्यंत विशेष कॅम्प

न्याय देवते”चा पुतळा राज्य घटनेच्या मुल्यांचे प्रतीक – न्यायमुर्ती के. व्ही. स्वामीनाथन उच्च न्यायालयात “न्याय देवते”च्या पुतळ्याचे अनावरण

500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा नियमांनुसारच*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे खंडन*ऑनलाईन निविदांच्या आक्षेपांचे प्री-टेंडर कॉन्फरन्स द्वारे होते निराकरण*निविदा कालावधीनंतरही आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मिळते संधी

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

vishwatmaklokswamivarta

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta