vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोकण विभागीय माहिती कार्यालला मिळाले नवे उपसंचालक*संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार*

*कोकण विभागीय माहिती कार्यालला मिळाले नवे उपसंचालक*संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार*

नवी मुंबई प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालकांच्या दालनात एका छोटेखानी आणि उत्साही कार्यक्रमात हा पदभार सोहळा संपन्न झाला. आतापर्यंत या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे होता. त्यांनी अत्यंत यशस्वीपणे ही जबाबदारी सांभाळत आज नवनियुक्त उपसंचालक श्री. चव्हाण यांच्याकडे या पदाची अधिकृत सूत्रे सुपूर्द केली आणि त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

या सोहळ्याप्रसंगी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह विभागीय माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजिटल माध्यमातून म्हणजेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

संबंधित पोस्ट

विभागीय महसुल क्रिडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन· महसुल राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा होणार सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांची माहिती

विशेष लेख -: इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी

vishwatmaklokswamivarta

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! 2 जुलैपासून राज्यभरात स्कूल बस बंद, आंदोलनाचा इशारा..

उद्यमशिलतेतून महिलांनी सक्षम व्हावे  —जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta