vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : सामाजिक न्याय विभागातंर्गत तृतीयपंथी नागरिकांना शासन निर्णय दि.13 मार्च 2026 उद्योगासाठी बीजभांडवल कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. एकूण 21 योजनांना लघु, मध्यम व दिर्घ कर्जाच्या योजनेकरीता कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच 12 व्यवसायांकरिता आवश्यक साधने संच (tool kit) करिता कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी दिली आहे.

 

योजनेचे निकष, अटी शर्ती व लाभाचे स्वरूप :-अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्ष रहिवासी असावा. तृतीयपंथी ओळख प्रमाणपत्र आवश्यक आहे. लाभार्थी हा 18 ते 50 वर्ष वयोगटातील व्यवसाय करण्यास सक्षम असावा.या योजनेत लघु कर्ज (रु. 25,000/-) मध्यम कर्ज (रु 50,000/-) व दिर्घ कर्जासाठी (रु.,2,00,000/-) एक कर्ज अनुज्ञेय राहील. या योजनेत स्वंयहिस्सा 5 टक्के, शासन अनुदान 45 टक्के व राष्ट्रीयीकृत बँकेकडून 50 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. लाभार्थ्यांना व्यवसाय परवाना, व्यवसायासाठी लागणाऱ्या यंत्र सामुग्रीचे कोटेशन, जागेचा पुरावा (7/12 किंवा भाडेकरार पत्र) व्यवसायासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र इत्यादी सादर करावे.

इच्छूक लाभार्थ्यांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कच्छि भवन, नमीनाथ मंदीराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील, श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचीथकीत कर्ज प्रकरणासाठी सवलत योजना..

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन▪️उपमुख्यमंत्र्यांनी केली देहू येथे संत तुकाराम महाराज पादुकांची विधीवत पूजा

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणेमार्फत“मास्टर ट्रेनर्स” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-2025  मंगळवारी साप्ताहिक बाजार राहणार बंद

vishwatmaklokswamivarta

सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ- मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे