vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

परळीतील महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

परळीतील महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी : परळी येथे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन एक्स्पो पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. या पशू प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी पशुधन एक्स्पोला भेट देणार आहेत.

शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील ओपळे मैदानात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ‘अखिल भारतीय पशुपक्षी महा पशुधन एक्स्पो प्रदर्शनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू पाहण्यास मिळणार असून प्रदर्शनाच्या तयारीला सध्या वेग आला आहे.

मुख्यमंत्री १५ ऐवजी १४ तारखेला परळीतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदर्शनाच्या समारोपाला म्हणजे रविवारी १५ तारखेला येणार होते, परंतु ते आता शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. येणार आहेत.

पशुप्रदर्शन ऐतिहासिक,या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

हा अत्यंत सुंदर योगायोग,महाशिवरात्र आणि महापशुधन एक्सपो हा अत्यंत सुंदर योगायोग आहे. परळीत असे प्रदर्शन व्हावे, अशी माझी इच्छा होती. नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजनांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

विमान सुरक्षेसाठी पक्ष्यांचा वावर कमी करणाऱ्या नव्या संकल्पना, तंत्रज्ञान शोधा- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलारवर्सोवा कचरा हस्तांतरण केंद्राला छप्पर टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश..

अमली पदार्थांबाबतची माहिती 112 या क्रमांकावर द्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्र्यांचा मोठा पुढाकार

vishwatmaklokswamivarta