vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लाड -पागे समितीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आणि आवास योजनेचा लाभ द्या- शेरसिंग डांगोर

लाड -पागे समितीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती आणि आवास योजनेचा लाभ द्या- शेरसिंग डांगोर

 

छत्रपती संभाजीनगर,  प्रतिनिधी सफाई कर्मचारी यांच्या वारसांना लाड- पागे समितीच्या निर्देशनानुसार नगरपालिका आणि महानगरपालिका प्रशासनाने सफाई कर्मचारी म्हणून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावी, तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या विविध आवास योजनेचा लाभ प्राधान्याने द्यावा असे निर्देश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डांगोर यानी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड ,पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शिंदे , घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, गंगापूर ,वैजापूर, पैठण ,छत्रपती संभाजीनगर नगरपालिकेचे मुख्याधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच इतर शासकीय आस्थापनामध्ये असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती प्रलंबित असेल तिथे तत्काळ अंमलबजावणी करून नियुक्ती द्यावी. शिष्यवृत्ती , इतर आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध योजनांचा समन्वय करून योजनाचा लाभ जिल्हा प्रशासनाने व नगरपालिका, समाज कल्याण विभागाने एकत्रितपणे द्यावा, यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वय साधून काम करावेअसे निर्देश बैठकीमध्ये श्री डांगोर यांनी दिले.

सफाई कर्मचारी काम करत असताना त्याच्या काम करण्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह, निवारा तसेच कपडे बदलण्यासाठीची जागा,आरोग्याच्या सुविधा आणि तात्पुरत्या स्वरूपात विश्रामगृहाची सुविधा असावी यासाठीचे प्रत्येक नगरपालिकांनी कक्ष स्थापन करून करावेत. वैजापूर नगरपालिकेत केलेल्या सुविधांचे आयोगाच्या अध्यक्ष डांगर यांनी कौतुक केले व याप्रमाणे इतर नगरपालिकेने कार्यवाही करावीअसे निर्देशित केले.

विविध सफाई कर्मचारी संघटनांच्या निवेदनाच्या स्वीकृती करून यावर उपयोजना साठी सूचना देण्यात आल्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्या साठी वेळेत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे या बैठकीमध्ये सूचित केले.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जालना ड्रायपोर्टचा पाहणी दौरा करून तेथील कामाचा सविस्तर आढावा…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभ…

धुळे शिष्यवृत्ती प्रकरणात गुन्हा नाही; पोलिसांचा ‘बी-समरी’ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पहाणी

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…